
दौंड सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी नवनाथ गावडे
दौंड, ता. २४ : दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी नवनाथ बाबूराव गावडे व उपाध्यक्षपदी संजीव राधन आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दौंड शहरातील सहकार भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश शितोळे यांच्या देखरेखीखाली पार पडलेल्या एका बैठकीत या निवडी करण्यात आल्या. संस्थेचे मार्गदर्शक तथा दौंड शुगर लिमिटेडचे संचालक वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष नवनाथ गावडे व उपाध्यक्ष संजीव आढाव यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक तथा माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे, बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ जगदाळे यांच्यासह सुहास जगदाळे, जालिंदर जगदाळे, धोंडिबा मेरगळ, गुलाब काळे, रावा पडळकर, विठ्ठल जगदाळे, आदी या वेळी उपस्थित होते.
दौंड सोसायटी १९६०मध्ये स्थापन झाली असून संस्थेचे १५४२ सभासद आहेत. संस्थेचे भाग भांडवल १ कोटी १७ लाख रुपये आहे. तर मागील आर्थिक वर्षात संस्थेस ३१ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेने लिंगाळी (ता. दौंड) येथे स्वमालकीची १२ गुंठे जागा विकत घेतली असून त्यावर बहुउद्देशीय व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू आहे.