दौंड तालुक्यात गव्हाची 
८९९ क्विंटल आवक

दौंड तालुक्यात गव्हाची ८९९ क्विंटल आवक

दौंड, ता. २४ : दौंड तालुक्यात गव्हाची आवक वाढली असून बाजारभावात वाढ झाली आहे. गव्हाची ८९९ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान २०३१ रुपये ; तर कमाल ३१०० प्रतिक्विंटल असा असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात गव्हाची ३५१ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २०२५ व कमाल २५०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची तब्बल ११ हजार ६०५ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान ०२५० तर कमाल १३०० रुपये बाजारभाव मिळाला आहे. तालुक्यात लिंबाची ५६ डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान ४०० व कमाल ७५१ रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला आहे. दौंड मुख्य बाजारातील कलिंगड व खरबुजाची आवक बंद झाली आहे.
मेथीची १ हजार १४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० व कमाल १२०० रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ३९० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान २००; तर कमाल ४०० रुपये दर मिळाला आहे.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - ०८५, वांगी - २००, दोडका - ३५०, भेंडी - २५०, कारली - ३५०, हिरवी मिरची - ३००, गवार - ५००, भोपळा - ०७५, काकडी - १५०, शिमला मिरची - ४००, कोबी - ०७५.

कोथिंबिरीच्या दरात वाढ...
दौंड तालुक्यात कोथिंबिरीची आवक घटली असून बाजारभावात वाढ झाली आहे. कोथिंबिरीची ७ हजार ५९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० रुपये, तर कमाल २००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कोथिंबिरीची ९ हजार ८४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल १५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला होता.


शेतमालाची आवक व बाजारभाव
शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू) कमाल ( रू)
गहू ८९९ २०३१ ३१००
ज्वारी १४४ २४०० ४८००
बाजरी १३३ १८०० ३३५१
हरभरा १०५ ४००० ४७००
चवळी ०१८ ८००० ८५००
मका ०९३ १६०० २१००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com