दौंडमध्ये ‘आपले सरकार’ च्या चालकाला मारहाण

दौंडमध्ये ‘आपले सरकार’ च्या चालकाला मारहाण

दौंड, ता. ३१ : दौंड शहरातील आपले सरकार सेवा केंद्राच्या चालकाला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, राजमाता अहल्यादेवी होळकर सहकार चौकातील सिटी प्राइड बिल्डिंगमधील आपले सरकार सेवा केंद्राचे व्यवस्थापक सदानंद वामन बनसोडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पूजा ऊर्फ आफरीन नियाज सय्यद या महिलेला केंद्रातून राजपत्र तयार करून घ्यायचे होते व त्यासाठी त्यांनी फोनवरून चौकशी केली होती. गैरसमजाच्या कारणावरून राजपत्र तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व भाषासंबंधी आधी माहिती का दिली नाही? असा जाब विचारत मंगळवारी (ता. ३०) आफरीन सय्यद व तिचा पती नियाज सय्यद हे सेवा केंद्रात दाखल झाले. त्यांना व्यवस्थापक बनसोडे यांनी सांगायचा प्रयत्न करण्याच्या आधीच नियाज याने हातातील बेल्टने पाठ व पोटावर मारहाण केली. केंद्रातील लोकांनी नियाज व त्याच्या पत्नीला केंद्राबाहेर काढले, परंतु दोघांनी त्यांनाही धमकावले.
दरम्यान काही वेळाने आफरीन हिने तिच्या भावाला बोलावून घेतले व त्याने तेथे येऊन मारहाण करण्यास सुरवात केली. केंद्रातील दाखले फाडून कागदपत्रे फेकून दिली. जातिवाचक शिवीगाळ करून पोलिसांकडे तक्रार दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सदानंद बनसोडे यांच्या फिर्यादीनुसार आफरीन नियाज सय्यद, नियाज सय्यद (दोघे रा. रेल्वे हॅास्पिटल जवळ, दौंड) व आफरीन हिचा भाऊ (नाव उपलब्ध नाही) या तिघांविरुद्ध अनुसूचित जाती- जमाती अत्याचार (अॅट्रोसिटी) प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com