दौंडला माजी नगरसेवकावर विवाहितेच्या छळाचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडला माजी नगरसेवकावर
विवाहितेच्या छळाचा गुन्हा
दौंडला माजी नगरसेवकावर विवाहितेच्या छळाचा गुन्हा

दौंडला माजी नगरसेवकावर विवाहितेच्या छळाचा गुन्हा

sakal_logo
By

दौंड, ता. ५ : दौंड शहरात विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह एकूण चार जणांविरुद्ध अॅट्रोसिटी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींमध्ये दौंड नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाचा समावेश आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा नवरा अमोल ज्ञानेश्वर मुळे, सासरा तथा माजी स्वीकृत नगरसेवक ज्ञानेश्वर अंबादास मुळे, सासू निर्मला ज्ञानेश्वर मुळे व दीर अजय ज्ञानेश्वर मुळे (सर्व रा. मेराज सोसायटी, स्वामी समर्थ मंदिर रस्ता, दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचा आणि अमोल यांचा सन २०२१ मध्ये प्रेमविवाह झाला होता. पतीचे एका महिलेसोबत संबंध निदर्शनास आल्यावर विवाहितेने विचारणा करताच तिला मारहाण करण्यासह उपाशी ठेवून मानसिक त्रास देण्यात आला. प्रेमविवाह केल्याने विवाहितेचे माहेरचे लोक तिच्याशी बोलत नसल्याने नाइलाजाने तिने छळ सहन केला. दरम्यान, तिला जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी चौघांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार (अॅट्रोसिटी) प्रतिबंध कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला.