दौंड तालुक्यात ज्वारीची ३५७ क्विंटल आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड तालुक्यात ज्वारीची ३५७ क्विंटल आवक
दौंड तालुक्यात ज्वारीची ३५७ क्विंटल आवक

दौंड तालुक्यात ज्वारीची ३५७ क्विंटल आवक

sakal_logo
By

दौंड, ता. ७ : दौंड तालुक्यात ज्वारीची आवक २४० क्विंटलने वाढली असून बाजारभावात ८०१ रुपयांनी वाढ झाली आहे. ज्वारीची ३५७ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान २७०० तर कमाल ४,८०१ रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात ज्वारीची ११७ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २३०० तर कमाल ४००० असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत आहेत. तालुक्यात लिंबाची ३५ डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान ४५० व कमाल ९०० रुपये प्रति डाग असा भाव मिळाला आहे. तालुक्यातील केडगाव उपबाजारात कांद्याची ८,१६० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान ०२५० तर कमाल १५०० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
कोथिंबिरीची ६,३८० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल १२०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची १,११० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० व कमाल १५०० रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ३१० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान २००; तर कमाल ४०० रुपये दर मिळाला आहे.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू) कमाल (रू)
गहू ६२४ २०७५ २९००
ज्वारी ३५७ २७०० ४८०१
बाजरी १८२ १७५० २७५१
हरभरा ०७८ ३५०० ४७००
चवळी ०१३ ८००० ९०००
मूग ०३२ ७००० ८०००
मका १८५ १६०० २१००

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - १८०, वांगी - २५० , दोडका - ४५० , भेंडी - ३२०, कारली - ४००, हिरवी मिरची - ६००, गवार - ५००, भोपळा - १००, काकडी - २००, शिमला मिरची - ५५०, कोबी - १२५.


मिरचीच्या दरात वाढ
दौंड तालुक्यात हिरव्या मिरचीची ६५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ३५० तर कमाल ६०० रुपये असा दर मिळाला आहे. मागील आठवड्यात हिरव्या मिरचीची ७१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ४०० रुपये दर मिळाला होता. तालुक्यात शिमला मिरचीची २८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २५० तर कमाल ५५० रुपये असा दर मिळाला आहे. मागील आठवड्यात शिमला मिरचीची ३० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ४०० रुपये दर मिळाला होता.