थ्रोबॅाल स्पर्धेत जोगेश्वरी महिला संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थ्रोबॅाल स्पर्धेत जोगेश्वरी महिला संघ विजेता
थ्रोबॅाल स्पर्धेत जोगेश्वरी महिला संघ विजेता

थ्रोबॅाल स्पर्धेत जोगेश्वरी महिला संघ विजेता

sakal_logo
By

दौंड, ता. ८ : दौंड शहरात महिलांसाठी आयोजित थ्रोबॅाल स्पर्धेत गोपाळवाडी येथील जोगेश्वरी स्वयंसेवी माहिला संघाने पहिले पुरस्कार पटकावले आहे.

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचच्या मैदानावर रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी व रोटरेक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले होते. सहायक समादेशक सुनील सरोदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. आशा सेविका, महिला बचत गट, जिल्हा परिषदेच्या शिक्षिका, अंगणवाडी सेविका, राज्य राखीव पोलिस दलातील महिला कर्मचारी, कणी महिला मंचाच्या सदस्या अशा एकूण ९५ जणींनी सहभाग नोंदविला. अनुक्रमे जोगेश्वरी महिला संघ (गोपाळवाडी), सावित्री महिला संघ (गोपाळवाडी) व आशा सेविका संघ (दौंड) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. श्रीनाथ संघ (गोपाळवाडी) व रोटरॅक्ट संघ (दौंड) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.

रोटरी क्लबचे क्रीडा संचालक प्रवीण होले यांच्यासह प्रसाद धिवार व साईबाबू पाडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. रोटरी क्लब ऑफ दौंडच्या अध्यक्षा सविता भोर, सचिव दीपक सोनवणे, रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसीचे अध्यक्ष शशिकांत पाटील व रोटरेक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेजचे अध्यक्ष प्रज्वल बांडे, सचिव हेमांगी बंब यांच्या हस्ते विजेत्या संघांना करंडक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. लिंगाळीच्या पोलिस पाटील नीता वाघमारे, कणी महिला मंचाच्या मनिषा सोनटक्के, कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षक ऊर्मिला गवळी व शीतल कडू, आदी उपस्थित होत्या.