शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न
शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न

शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

डोर्लेवाडी, ता. १ : ‘‘आम्ही केवळ शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला महत्त्व देत आलो आहोत. कुणाचेही नुकसान होईल, अशी कामे आम्ही कधीच केली नाहीत. मात्र, विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्यामुळे ते शेतकऱ्यांना भडकावून देत आहेत,’’ असा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला.
डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे एका खासगी कार्यक्रमाप्रसंगी पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘नीरा डावा व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरण कामास अनेक ठिकाणी पाठिंबा व विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. कालव्याचे सरसकट अस्तरीकरण होणार नाही. ज्या ठिकाणी अडचण व गरज आहे, अशा ठिकाणचीच कामे होणार आहेत. हे जाहीर करूनही विरोधक भांडवल करून जनतेच्या मनात विष कालवण्याचे काम करीत आहेत. जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.’’
‘‘सन २०२१-२२ मध्ये वेळेवर पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारची व्याज सवलत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. स्वस्त धान्य लाभार्थींना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन शासनाने केले आहे. मात्र, यात कोणालाही सक्ती नाही, तो ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे,’ असेही अजित पवार यांनी नमूद केले.

‘रस्ता रुंदीकरणाबाबत मार्ग काढू’
‘‘डोर्लेवाडी येथील बीकेबीएन रस्त्याच्या कामात अनेक तक्रारी येत आहेत. अनेक ग्रामस्थांची १० मीटर रस्ता व्हावा, अशी मागणी आहे. आपल्या गावाचे नागरीकरण वाढत असताना मोठे रस्ते होणे गरजेचे आहे. इतर नागरिकांनीही त्यास विरोध करू नये. रस्ता रुंदीकरण करण्यास खरेच अडचणी असतील; तर त्यातून योग्य मार्ग काढला जाईल,’’ असे आश्‍वासन अजित पवार यांनी दिले.

Web Title: Todays Latest District Marathi News Dor22b00272 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..