राजेगाव सोसायटीवर भाजपचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेगाव सोसायटीवर भाजपचे वर्चस्व
राजेगाव सोसायटीवर भाजपचे वर्चस्व

राजेगाव सोसायटीवर भाजपचे वर्चस्व

sakal_logo
By

देऊळगाव राजे, ता. ४ : राजेगाव (ता. दौंड) येथील राजेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तीन पॅनेलमध्ये झालेल्या चुरशीची लढतीत भाजप पुरस्कृत राजेश्वर जनसेवा पॅनेलने तेरा जागांपैकी अकरा जागा जिंकून संस्थेवर सत्ता परिवर्तन केले. राष्ट्रवादी पुरस्कृत जय राजनाथ सहकार पॅनेलला दोन जागा मिळाल्या. तर, राजेश्वर जनशक्ती पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही.
राजेश्‍वर सोसायटीच्या तेरा जांगासाठी भाजपच्या राजेश्वर जनसेवा, राष्ट्रवादीच्या जय राजनाथ व प्रहार जनशक्तीच्या राजेश्वर जनशक्ती या पॅनेलमध्ये तिरंगी लढत झाली. त्यात राजेश्वर जनसेवा पॅनेलचे मयूर गुणवरे, अमोल मोरे, गोविंद कडू, भाऊ ढेंबरे, राजेंद्र खैरे, शरद मेंगावडे, मधुकर जामले, जयश्री मोरे, रमेश जाधव, विठ्ठल मोघे, संदीप टेंगले आदी उमेदवार विजयी झाले. तर, जय राजनाथ सहकार पॅनेलचे अप्पासाहेब मेंगावडे, वर्षा मोरे हे उमेदवार विजयी झाले. विजयी राजेश्वर जनसेवा पॅनेलचे नेतृत्व मुकेश गुणवरे यांनी केले. पराभूत जय राजनाथ सहकार पॅनेलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सदस्य नवनीत जाधव, मिलिंद मोरे यांनी केले. तिसऱ्या या पराभूत प्रहार जनशक्ती पॅनेलचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश शितोळे यांनी केले.

सरपंच, अध्यक्षांचा पराभव
या चुरशीच्या निवडणुकीमध्ये राजेगावचे सरपंच प्रवीण लोंढे यांचा एका मताने पराभव झाला. तसेच, राजेश्वर सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सचिन जाधव यांचाही पराभव झाला. निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांच्यासह मयूर गुणवरे, अप्पासाहेब मेंगावडे, अमोल मोरे, विठ्ठल मोघे, वर्षा मोरे या प्रमुख उमेदवारांनी विजय संपादित केला. संस्थेवरील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात येऊन भाजपची सत्ता आली आहे. निवडणुकीत रमेश शितोळे यांच्या पॅनेलचा मोठ्या फरकाने पराभव झाला.

आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे चांगले कामकाज करू.
- मुकेश गुणवरे, प्रमुख, राजेश्वर जनसेवा पॅनेल

Web Title: Todays Latest District Marathi News Dur22b00036 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top