खोरवडी सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोरवडी सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
खोरवडी सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

खोरवडी सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

sakal_logo
By

देऊळगाव राजे, ता. ११ : खोरवडी (ता. दौंड) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत भैरवनाथ सहकार विकास पॅनेलने तेरा जागांपैकी अकरा जागा जिंकून संस्थेवर आपले वर्चस्व कायम ठेवले. तर, विरुद्ध भाजप व इतरांच्या शेतकरी परिवर्तन पॅनेलला अवघा दोन जागा मिळाल्या.
या सोसायटीच्या तेरा जांगासाठी राष्ट्रवादीच्या भैरवनाथ सहकार विरुद्ध भाजप, शेतकरी संघटना व इतर पदाधिकारी यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये भैरवनाथ सहकार पॅनेलचे दीपक खोमणे, संपत घुले, बजरंग दगडे, रावा घुले, विक्रम दगडे, सतीश धावडे, राजू मोहीते, अलका भंडगर, गऊबाई आवदे, शोभा चव्हाण, प्रकाश जठार हे उमेदवार विजयी झाले. तर, शेतकरी परिवर्तन पॅनेलचे रघुनाथ धावडे व भाऊसाहेब सकट हे उमेदवार विजयी झाले.
विजयी भैरवनाथ सहकार पॅनेलचे नेतृत्व पोपटराव खोमणे, सावळाराम दगडे, शांताराम जठार, बाळासाहेब दगडे, कैलास खोमणे, किसन घुले, पांडुरंग दगडे, सुभाष मोहीते यांनी केले. पराभुत शेतकरी परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व अनिल गोसावी, भगवान जगताप, राजेंद्र गुन्नर यांनी केले.

लीड कमी करण्यात यश
राष्ट्रवादीच्या पॅनेलला शह देण्यासाठी गावातील भाजप, शेतकरी संघटना व नाराज पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी परिवर्तन पॅनेल उभारून कडवे आव्हान दिले. त्यामुळे विजयी पॅनेलचे लीड कमी करण्यात त्यांना यश आले. परंतु, तरीही संस्थेवर सत्ता राखण्यात राष्ट्रवादीला यश आले.

जगदाळे यांच्या हस्ते सन्मान
विजयानंतर पॅनेल प्रमुख व सोसायटीच्या संचालकांनी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा दौंड शुगर कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांची भेट घेतली. यावेळी जगदाळे यांच्या हस्ते संचालकांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Todays Latest District Marathi News Dur22b00037 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top