
पेडगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध
देऊळगाव राजे, ता. १३ : पेडगाव (ता. दौंड) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे बिनविरोध पार पडली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी तेरा जागांसाठी तेराच उमेदवारी अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
संस्थेच्या तेरा जागांसाठी तीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या दिवशी सतरा जणांनी माघार घेतली. यामुळे संस्थेवर संचालक म्हणून अजय गोरे, पोपटराव जगताप, बाळासाहेब गोडसे, अशोक होरे, शांताराम गरदाडे, रघुनाथ दबडे, विलास दबडे, संजय इंदलकर, सुरेखा गोधडे, संगीता गायकवाड, दत्तात्रेय यादव, आबासाहेब चव्हाण, प्रकाश घोडके यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी लवासा मोशीचे सरपंच राजेंद्र दबडे, बाळासाहेब इंदलकर, दादा जाधव, भीमराव गोरे, नवनाथ गोरे, सुरेश घोडके, आत्माराम गोरे, दत्तात्रेय होरे आदी उपस्थित होते. निवडीनंतर संचालकांचे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Dur22b00038 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..