माती चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माती चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा
माती चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा

माती चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा

sakal_logo
By

देऊळगाव राजे, ता.२८ : नायगाव (ता.दौंड) येथील उजनी धरणासाठी संपादीत केलेल्या क्षेत्रामधुन बेकायदेशीरपणे मातीचोरी केल्याप्रकरणी तीन जंणावर (ता.२३ ) गुन्हा दाखल केला आहे,अशी माहीती पोलिस हवालदार महेंद्र लोहार यांनी दिली.
याप्रकरणी मुकेश मोरे, मिलिंद मोरे, सागर जाधव (सर्व,रा.राजेगाव ता.दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मलठणचे गावकामगार तलाठी नंदकुमार खरात यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. संबंधितांनी (ता.२२ ) रोजी रात्रीच्या वेळी नायगाव हद्दितील जलसंपदा विभागाने उजनी धरणासाठी संपादीत केलेल्या गट.न.१० मधुन अवैधरित्या मातीचे उत्खनन्न करुन चोरुन नेली आहे .त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. शासकीय रॉयल्टी न भरता गौणखनिजाचा अपहार केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पुढील तपास श्री.लोहार करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Dur22b00049 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..