देऊळगाव राजे येथे महिलांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देऊळगाव राजे येथे महिलांना मार्गदर्शन
देऊळगाव राजे येथे महिलांना मार्गदर्शन

देऊळगाव राजे येथे महिलांना मार्गदर्शन

sakal_logo
By

देऊळगाव राजे, ता. ४ : येथे देऊळगाव राजे (ता. दौंड) ग्रामपंचायत व रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमास सरपंच स्वाती गिरमकर, रोटरी क्लब ऑफ दौंडचे अध्यक्ष डॉ. राजेश दाते, राकेश अग्रवाल, ग्रामपंचायत सदस्या शुभांगी गिरमकर, वृषाली औताडे आदी उपस्थित होते.
या वेळी महिलांना श्रीगोंदा येथील महिला उघोजिका प्रतिभा गांधी यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिलांचे हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक अमीर शेख यांनी केले. तर आभार सरपंच स्वाती गिरमकर यांनी मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Dur22b00051 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top