Wed, Feb 8, 2023

दौंडच्या पूर्व भागात
उभी पिके भुईसपाट
दौंडच्या पूर्व भागात उभी पिके भुईसपाट
Published on : 18 October 2022, 3:23 am
देऊळगाव राजे, ता. १८ : दौंड तालुक्याच्या पूर्वभागात सोमवारी (ता. १७) रात्री मुसळधार पाऊस झाला. देऊळगाव राजे येथे तब्बल १२८ मि.मी. पाऊस झाला. मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. खरिपाची पिके भुईसपाट झाली असून, ऊस लागवडी वाया जाणार आहे. सोमवारी रात्री खोरवडी, आलेगाव, देऊळगाव राजे, वडगाव दरेकर, पेडगाव, शिरापूर, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, बोरीबेल, मलठण, वाटलुज, नायगाव, राजेगाव, खानवटे या गावांच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. मोठ्या पावसामुळे काही घरामध्ये पाणी आले. ओढे नाल्यांना पुर आला. मलठण हद्दीतील पुलावरून पाणी वाहिल्याने दौंड-मलठण वाहतूक काही तास बंद पडली होती. पाण्याच्या प्रवाहामुळे बांध, ताली ठिकठिकाणी फुटले. कडवळ, खरिपाची पिके जमीनदोस्त झाली.