Mon, Feb 6, 2023

वडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी किरण कापसे
वडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी किरण कापसे
Published on : 30 December 2022, 11:39 am
देऊळगाव राजे, ता. ३० : वडगाव दरेकर (ता. दौंड) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी किरण संपतराव कापसे यांची तर उपाध्यक्षपदी सुनीता संजय चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.
संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग बाराते व उपाध्यक्ष बापू नागवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. अध्यक्ष पदासाठी किरण कापसे व उपाध्यक्ष पदासाठी सुनीता चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी पी.सी.शितोळे यांनी जाहीर केले.
यावेळी माजी सरपंच सुखदेव वाघमोरे, संपतराव कापसे, अंकुश माने, दत्तोबा बाराते, पोपटराव माने, पांडुरंग बाराते, सचिव शाम रणशिंगारे, सहसचिव मोहन आवचर आदी उपस्थित होते.