Thur, March 23, 2023

संजय राऊत यांचा
दौंड तालुक्यात निषेध
संजय राऊत यांचा दौंड तालुक्यात निषेध
Published on : 15 March 2023, 2:46 am
देऊळगाव राजे, ता. १५ : आमदार व भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्याने खासदार संजय राऊत यांचा दौंड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कुल यांच्या समर्थकांनी निषेध व्यक्त केला. तसेच, राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले.
राजेगाव, मलठण, देऊळगाव राजे येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध केला. देऊळगाव राजे येथे हरिश्चंद्र ठोंबरे, तुकाराम आवचर, हेमंत कदम, अभिमन्यू गिरमकर, नंदकिशोर पाचपुते, पंकज बुहाडे, सतीश आवचर, कानिफ सूर्यवंशी, देविदास ढवळे, सचिन कदम, लालासाहेब गिरमकर आदी उपस्थित होते.