''दौंड शुगर'' देणार उसाला विक्रमी भाव

''दौंड शुगर'' देणार उसाला विक्रमी भाव

देऊळगाव राजे, ता.४ : दौंड शुगर साखर कारखाना २०२३-२४ च्या गाळप हंगामामध्ये प्रतिदिन सतरा हजार टनाने उसाचे गाळप करणार आहे. त्यादृष्टीने कारखान्याने ऊस पुरवठ्याचे नियोजन केले आहे. कारखाना उसाचे विक्रमी गाळप करून उसाला भाव सुध्दा विक्रमी दिला जाणार आहे, अशी माहिती कारखान्यांचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.

आलेगाव (ता.दौंड) येथील दौंड शुगर साखर कारखान्याने २०२३-२४ चे ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. यांची माहिती देताना जगदाळे बोलत होते. यावेळी कारखान्यांचे शेतकी अधिकारी दीपक वाघ, ऊस विकास अधिकारी संदेश बेनके आदी उपस्थित होते. कारखान्याने १५ जूनपासून ८६०३२, ०२६५, १५०१२ या उसाच्या आडसाली लागवडींना परवानगी दिली आहे. तसेच ऊस तोडणीसाठी ठिकठिकाणी दहा गटांची वाढ केली आहे. यामुळे सध्या वीस गट झाले आहेत. कारखान्याने गाळप केलेल्या उसाला १२.२१ चा साखर उतारा मिळाला आहे. सदर साखर उतारा जिल्ह्यात एक नंबरचा असल्याचेही जगदाळे यांनी सांगितले.

दरम्यान, कारखान्यांच्या वतीने देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे १२ जून रोजी ''बदलते हवामान व शेती'' या विषयावर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे.

शेतकऱ्याचे एकरी ऊस उत्पादन वाढविण्याकरता कारखान्यांचे वतीने ऊस विकास योजना राबविण्यात येत आहे. यासाठी अभ्यास दौऱ्याचेही आयोजन केले जाते. कारखान्यांच्या वतीने अल्पदरामध्ये शेतकऱ्यांना तेरा हजार टन कंपोस्ट खताची विक्री केली आहे. उसाचे एकरी उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पायाभूत ऊस बेणे मळा तयार करावा.
- वीरधवल जगदाळे, संचालक, दौंड शुगर साखर कारखाना

—————————————————————————————————————————————

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com