
नारोडी येथील शाळेत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण
घोडेगाव, ता. ६ ः शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुसरा व्यवसाय केल्यास निश्चितच त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. समाजात शुद्ध मध घेणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. शुद्ध मध हे केवळ मधुमक्षिका पालनातूनच मिळत असते. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन हा व्यवसाय करून आर्थिक फायदा करून घ्यावा. सर्व विद्यार्थ्यांनी घरी जाऊन आपल्या पालकांना या संदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन कार्यक्रमात सीबीआरटीआयचे मास्टर ट्रेनर प्रा हेमंतकुमार तुकाराम डुंबरे यांनी केले.
नारोडी (ता. आंबेगाव) येथील मुक्तादेवी विद्यालय येथे आयोजित मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाप्रसंगी ते बोलत होते. मुख्याध्यापक आत्माराम गाडे म्हणाले, ‘‘पिकांच्या परागीभवनामध्ये मधमाशीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच विविध पिकांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे मधमाशी वाचवणे ही काळाची गरज आहे.’’
प्रशिक्षणामध्ये डुंबरे यांच्या सोबत प्रा. निलम रघुनाथ बांगर, मधमाशी अभ्यासक यांनी भाग घेतला. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी मधमाशीचे मानवी जीवनामधील महत्त्व, मधमाशीच्या जाती, पोळ्याची रचना, पोळ्यामधील राणी, नर आणि कामकरी माशीचे कार्य, कामकरी माशी मध कसा तयार करते आदींबाबत प्रा. डुंबरे व प्रा. बांगर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नामदेव डोके यांनी केले. तर आभार भगवान भोर यांनी मानले.
Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00909 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..