मैत्री संघातर्फे मुलींना कबड्डीचे साहित्य भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैत्री संघातर्फे मुलींना कबड्डीचे साहित्य भेट
मैत्री संघातर्फे मुलींना कबड्डीचे साहित्य भेट

मैत्री संघातर्फे मुलींना कबड्डीचे साहित्य भेट

sakal_logo
By

घोडेगाव, ता. १४ ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील महिला मैत्री संघाने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत कबड्डीचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींना कबड्डीच्या सराव करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य घोडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच क्रांतीताई गाढवे यांनी दिले.
ग्रामपंचायतीच्या मार्फत कबड्डी मॅट, मैत्री ग्रुप तर्फे कबड्डी ड्रेस किट,तसेच कबड्डी स्पोर्ट शूज आदी वस्तू भेट दिल्या. मैत्री संघाचे कार्य पाहून घोडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक अनिल चव्हाण यांनी देखिल खारीचा वाटा उचलला आहे. १४ कबड्डी खेळाडू मुलींना टि-शर्ट व फूल पॅन्टची मदत केली. मुलींच्या कबड्डी सरावासाठी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाने आपल्या प्रशालेतील विद्यार्थिनींच्या प्रशिक्षणासाठी हॉल दिला असल्याचे कबड्डी प्रशिक्षक राजेंद्र पानसरे यांनी सांगितले.
या प्रसंगी शरद सहकारी बँकेच्या संचालिका रुपाली झोडगे, अनुसया उन्नती केंद्राच्या संचालिका ज्योती घोडेकर,घोडेगाव महिला दक्षता समिती अध्यक्षा रत्ना गाडे, माधवी कर्पे, शुभांगी बेलापूरकर, अंजली आंधळे, शोभा सोमवंशी, अमोल बोऱ्हाडे आदींसह कबड्डी प्रशिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या वेळी मदतीसाठी धावून आलेल्या मैत्री संघाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00913 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top