आंबेगावातील कामांचा दर्जा सुधारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावातील कामांचा दर्जा सुधारा
आंबेगावातील कामांचा दर्जा सुधारा

आंबेगावातील कामांचा दर्जा सुधारा

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २३ : ‘‘आंबेगाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोट्यवधी रुपयांची विकास कामे चालू आहेत. परंतु, संबंधित कामे चांगल्या पद्धतीने होत नाही. याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या, तरी संबंधितांवर कारवाई आपल्या विभागाकडून होत नाही. त्यामुळे संबंधित चालू असलेल्या कामांचा दर्जा सुधारला नाही, तर मी स्वतः तक्रार करेल,’’ असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित सर्व खात्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, विद्युत विभाग उपकार्यकारी अधिकारी शैलेश गिते, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, लहू थाटे, भिमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी समाजकल्याण सभापती सुभाषराव मोरमारे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, कैलासबुवा काळे, जयसिंगराव काळे, शरद बॅंकेचे संचालक सुदामराव काळे, रूपाली झोडगे, सरपंच क्रांती गाढवे आदी उपस्थित होते.
विद्युत विभागाने गंजलेले खांब बदलावे, घोडेगाव येथील हरिश्चंद्र महादेव मंदिर संस्थानचा ‘क’ वर्गासाठी प्रस्ताव द्या,
टंचाईग्रस्त भागात तातडीने पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समिती व तहसील कार्यालय ताबडतोब निर्णय घ्यावा, यासाठी शासन स्तरावर सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

आंबेगाव तालुक्यामध्ये खते व बी-बियाणे यांचा तुटवडा होणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोट्यवधींची कामे सुरू आहेत ही कामे दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून लक्ष देऊन काम करून घ्यावीत.
- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00925 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top