
मंचरऐवजी पिंपळगावतर्फे महाळुंगे गण
घोडेगाव / मंचर, ता. २ : आंबेगाव जिल्हा परिषदेचे ५ गट व १० पंचायत समिती गटनिहाय गावांची नावे निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यात घोडेगाव व अवसरी बुद्रूक, कळंब, पिंपळगावतर्फे महाळुंगे या गणात बदल झाले आहेत. मंचर येथे नगरपंचायत झाल्याने या गणाचे नाव पिंपळगावतर्फे महाळुंगे झाले आहे.
नव्या रचनेत घोडेगाव गणातून गिरवली, रामवाडी व ठाकरवाडी ही गावे वगळण्यात आली असून, त्यात चास व कडेवाडी ही गावे आली आहेत. पेठ गणातून निघोटवाडी वगळून पिंपळगावतर्फे महाळुंगे गणात आली आहे. कळंब गणात गिरवली, रामवाडी, ठाकरवाडी ही गावे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे.
१) शिनोली-बोरघर गट
बोरघर गण : आहुपे, पिंपरगणे, आघाणे, तिरपाड, डोण, न्हावेड, नानवडे, पाटण, पिंपरी, साकेरी, महाळुंगे तर्फे आंबेगाव, असाणे, मेनुंबरवाडी, माळीण, आमडे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द, दिगद, मेघोली, कोंढरे, पंचाळे बुद्रुक, पंचाळे खुर्द, अडिवरे, वचपे, बोरघर, आंबेगाव, वरसावणे, फुलवडे, महाळुंगेतर्फे घोडा, कानसे, सुपेधर, चपटेवाडी, गंगापुर बुद्रुक, गंगापुर खुर्द, आपटी, आमोंडी, फलकेवाडी.
शिनोली गण- फदालेवाडी/उगलेवाडी, पिंपळगाव तर्फे घोडा, पोखरकरवाडी, डिंभे खुर्द, मापोली, गोहे बुद्रुक, गोहे खुर्द, डिंभे बुद्रक, कोलतावडे, कळंबई, राजेवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी, नांदुरकीचीवाडी, तळेघर, फलोदे, सावरली, राजपुर, गाडेवाडी, कोंढवळ, निगडाळे, तेरूंगण.
२) घोडेगाव-पेठ गट
घोडेगाव गण- घोडेगाव, आंबेगाव गावठाण, कोलदरा गोनवडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, चिंचोली, नारोडी, चास, कडेवाडी, काळेवाडी-दरेकरवाडी, गवारवाडी, ढाकाळे, आंबेदरा, साल, तळेकरवाडी.
पेठ गण- पेठ, श्रीरामनगर, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी, चिंचोडी, शेवाळवाडी- लांडेवाडी, पिंगळवाडी-लांडेवाडी, कोळवाडी- कोटमदरा.
३) कळंब-चांडोली गट
कळंब गण- ठाकरवाडी, गिरवली, रामवाडी, महाळुंगे पडवळ, माळवाडी, ठाकरवाडी, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, साकोरे, नांदुर, लौकी, कळंब.
चांडोली बुद्रुक गण- चांडोली बुद्रुक, खडकी, भराडी, थोरांदळे, नागापुर, जाधववाडी, रांजणी, वळती, भागडी.
४) पारगावतर्फे अवसरी बुद्रुक- जारकरवाडी गट
पारगाव तर्फे अवसरी बुद्रक गण- शिंगवे, निरगुडसर, मेंगडेवाडी, जवळे, पारगाव तर्फे अवसरी बुद्रक, काठापुर बुद्रुक.
जारकरवाडी गण- पोंदेवाडी, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी, लाखणगाव, देवगाव, जारकरवाडी, रानमळा, वडगाव पीर, मांदळेवाडी, शिरदाळे, धामणी, पहाडदरा.
५) अवसरी बुद्रुक-पिंपळगावतर्फे महाळुंगे गट
पिंपळगावतर्फे महाळुंगे गण- वडगाव काशिबेंग, वाळुंजवाडी, एकलहरे, सुलतानपुर, तांबडेमळा, शेवाळवाडी, निघोटवाडी, पिंपळगावतर्फे महाळुंगे, टाव्हरेवाडी, चांडोली खुर्द.
अवसरी बुद्रुक गण- अवसरी खुर्द, खडकमळा, शिंदेमळा, भोरवाडी, वायाळमळा, पारगाव तर्फे खेड, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी.
Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00934 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..