अनुसूचित जातीच्या आरक्षित मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुसूचित जातीच्या आरक्षित मागणी
अनुसूचित जातीच्या आरक्षित मागणी

अनुसूचित जातीच्या आरक्षित मागणी

sakal_logo
By

घोडेगाव, ता. ७ ः आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात अनुसूचित जातीला आरक्षण मिळावे, अशी मागणी युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
आंबेगाव तालुक्यात १९८५ पासून अनुसूचित जातीच्या प्रवर्गाला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आरक्षण मिळालेले नाही. परिणामी हा समाज आरक्षणापासून ३५ ते ४० वर्ष वंचित राहिला आहे. २००१ व २०११ च्या जनगणनेमध्ये चुकीची आकडेवारी लागल्यामुळे आरक्षण सोडत होत नाही. याबाबतची वस्तुस्थिती विविध मार्गांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. त्यामुळे अनुसूचित जातीचे आरक्षण गट, गणांना ठेवावे, असे खरात यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00935 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top