घोडेगावात सोमवारी फिरते लोक न्यायालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडेगावात सोमवारी फिरते लोक न्यायालय
घोडेगावात सोमवारी फिरते लोक न्यायालय

घोडेगावात सोमवारी फिरते लोक न्यायालय

sakal_logo
By

घोडेगाव, ता. १० : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तालुका पंचायत समिती कार्यालय येथे सोमवारी (ता. १३) सकाळी १० वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण फिरते लोक न्यायालय होणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त पक्षकारांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी केले.
यामध्ये विविध प्रकारची दिवाणी वसुली दावे, फौजदारी, धनादेश न वटल्याची प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्याप्रमाणे विविध बॅंका, वित्तीय कंपन्या तसेच मोबाईल-दूरध्वनी कंपन्यांकडील दाखलपूर्व प्रकरणे, विविध शासकीय, निमशासकीय, पोलिस खात्याकडील दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणेही तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. लोक न्यायालयामध्ये तडजोडीने खटले मिटविले जाणार असून, नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, मंगळवारी (ता. १४) शिनोली येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर होणार आहे. त्यामध्ये विविध कायद्यांवरील माहिती, मोफत कायदेविषयक साह्य व सल्ला योजना, समुपदेशनाद्वारे प्रकरणांमध्ये समझोता आणि गोरगरिबांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना यांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. फिरते लोक न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिरासाठी उच्च न्यायालय मुंबई यांनी निवृत्त न्यायाधीश व घोडेगाव न्यायालयातील दोन वकिलांची पॅनेल न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली असल्याचे गटविकास अधिकारी पठारे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00942 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top