हरिश्चंद्र विकास पॅनेलचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरिश्चंद्र विकास पॅनेलचे वर्चस्व
हरिश्चंद्र विकास पॅनेलचे वर्चस्व

हरिश्चंद्र विकास पॅनेलचे वर्चस्व

sakal_logo
By

घोडेगाव, ता. १२ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री राजा हरिश्चंद्र विद्या विकास पॅनेलच्या दहा, तर श्री राजा हरिश्चंद्र परिवर्तन पॅनेलच्या सहा जागा विजयी झाल्या. एकूण ३६९ सभासदांनी मतदान केले. आंबेगावच्या पश्चिम भागातील ही मोठी शैक्षणिक संस्था आहे. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. श्री राजा हरिश्चंद्र विद्या विकास पॅनेलमधून विश्वास काळे, वैभव काळे, सूर्यकांत गांधी, अजित काळे, सुरेशशेठ काळे, ॲड. संजय आर्वीकर, ॲड. मुकुंद काळे, प्रशांत काळे, नवनाथ काळे, तुकाराम काळे, अशी एकूण दहा जणांची निवड झाली. तर, श्री राजा हरिश्चंद्र परिवर्तन पॅनेलमधून सोमनाथ काळे, श्यामशेठ होनराव, जयसिंग काळे, अक्षय काळे, राजेश काळे, बाळासाहेब काळे हे सहाजण निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. पुरुषोत्तम काळे, उत्कर्ष काळे, शंकर गाडेकर यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00944 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top