
भीमाशंकर कारखान्यासाठी १०७ इच्छुक
घोडेगाव, ता. १७ : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत (ता. १७) १०७ उमेदवारांनी १२० उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्याच दिवशी विक्रमी ११८ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
अवसरी बुद्रक-पारगाव गटातून १९ अर्ज, शिंगवे गटातून २४ अर्ज, अवसरी गटातून १८ अर्ज, मंचर गटातून ९ अर्ज, घोडेगाव गटातून १३ अर्ज, ब गटातून ६ अर्ज, एसटी/एससी गटातून ४ अर्ज, महिला गटातून १२ अर्ज, इतर मागास वर्ग गटातून ९ अर्ज, भटक्या विमुक्त जमाती गटातून ६ अर्ज दाखल झाले आहेत. २० जून रोजी अर्जांची छाननी होणार असून, उमेदवारी माघार घेण्याची मुदत २१ जून ते ५ जुलैपर्यंत असल्याची माहिती निवडणूक अधिकारी रमा जोशी यांनी दिली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदिप वळसे पाटील यांनी पणन व ऊस उत्पादक गटातून अर्ज दाखल केले आहेत. तसेच, कारखान्याचे अध्यक्ष भगवान बेंडे पाटील, माजी अध्यक्ष देवदत्त निकम, ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढोबळे, माजी सभापती सखाराम घोडेकर, विद्यमान संचालक अक्षय काळे, रमेश कानडे, शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, सुरेश काळे, दशरथ काळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. दिलीप वळसे पाटील यांची इच्छुक उमेदवारांनी भेट घेऊन उमेदवारी मिळण्याची मागणी केली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी देताना पक्षाला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद सहकारी बँक बिनविरोध झाली. तसेच, कारखान्याची निवडणूकही बिनविरोध होईल, असे विद्यमान संचालक प्रदिप वळसे पाटील यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00955 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..