
तळेघर येथे करिअर मार्गदर्शन मेळाव्यास प्रतिसाद
घोडेगाव, ता. २५ : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आंबेगाव तालुका समितीने, नुकतेच इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिवशंकर विद्यालय, तळेघर येथे करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधींची माहिती झाली पाहिजे, विद्यार्थ्यांनी चांगल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेतले पाहिजे, त्यांना शाखा निवड व भविष्यातील करिअरच्या संधी माहिती व्हाव्यात यासाठी मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, हे ओळखून या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात प्रतिभा कॉलेज चिंचवड येथील प्रा. मनीष पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी व त्यासाठी कसा अभ्यास करावा, याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन शहीद राजगुरू ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, फलोदे व एसएफआय आंबेगाव तालुका समितीने केले होते. तसेच माजी नायब तहसीलदार विजय केंगले यांनी विशेष प्रयत्न केले होते. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. या वेळी शिवशंकर महाविद्यालय तळेघरचे मुख्याध्यापक बी. डी. कवडे, एस. पी. जोशी, एसएफआयचे तालुका अध्यक्ष दीपक वाळकोळी, सहसचिव हरिदास घोडे, उपाध्यक्ष रोशन पेकारी, कोषाध्यक्ष रोहिदास फलके व किसान सभेचे मच्छिंद्र वाघमारे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00961 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..