आंबेगावात आरोग्य सेवेबाबत बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावात आरोग्य सेवेबाबत बैठक
आंबेगावात आरोग्य सेवेबाबत बैठक

आंबेगावात आरोग्य सेवेबाबत बैठक

sakal_logo
By

घोडेगाव ता. २६ : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात विशेषतः पावसाळ्यात आरोग्याबाबत अनेक समस्या तयार होतात. यात डॉक्टर व कर्मचारी यांच्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी आदिवासी भागातील उपकेंद्रात नेमणुकीस असलेले समुदाय वैद्यकीय अधिकारी दोन दिवस रुग्णतपासणी करतील. उर्वरित दिवसांत उपकेंद्रांतर्गत येणारी गावे, वाड्या-वस्त्यांवर जाऊन रुग्णसेवा देतील, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समिती सभागृहात प्राथमिक आरोग्य केंद्र डिंभे, तळेघर, अडिवरे या केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांतील समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका, किसान सभा, आंबेगाव तालुका समिती पदाधिकारी व ग्रामस्थ यांची एकत्रित समन्वय बैठक पार पडली, या वेळी डॉ. ढेकळे बोलत होते. या वेळी आंबेगाव तालुका किसान सभेचे उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी, बाळू काठे, रेश्मा गिरंगे, शंकर काठे, रामदास लोहकरे, दत्ता गिरंगे, आदिम व साथी संस्थेचे अनिल सुपे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00964 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..