आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग कार्डधारकांना अडचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग कार्डधारकांना अडचणी
आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग कार्डधारकांना अडचणी

आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग कार्डधारकांना अडचणी

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २७ : आंबेगाव तालुक्यात रेशनिंग कार्ड ग्राहकांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. युवा सेनेकडे त्या संबंधी तक्रार आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी लेखी मागणी आंबेगाव तालुका युवतीसेनेच्या नीलम गावडे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रेशनिंग कार्ड मधून नाव कमी करणे, नाव वाढवणे अथवा विभक्त रेशन कार्ड करणे यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. गरीब जनतेचे प्रश्न मार्ग लागावे यासाठी नायब तहसीलदार ए. बी. गवारी यांच्याकडे युवती सेनेमार्फत निवेदन दिले. त्या वेळी युवती सेना सदस्या तसेच ग्रामपंचायत सदस्या डॉ. निलम किशोर गावडे यांनी नागरिकांची हेळसांड न थांबल्यास युवती सेना आंबेगावच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले. त्यावेळी आंबेगाव तालुक्यातील युवती सेना सदस्या माधुरी अंकुश, रूपाली अंकुश, अंकिता तोत्रे, सोनाली फदाले, साक्षी फदाले उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00966 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top