भीमाशंकर यात्रेसाठी योग्य नियोजन करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमाशंकर यात्रेसाठी योग्य नियोजन करा
भीमाशंकर यात्रेसाठी योग्य नियोजन करा

भीमाशंकर यात्रेसाठी योग्य नियोजन करा

sakal_logo
By

घोडेगाव, ता. ५ : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार यात्रेसाठी प्रशासन व देवस्थान समिती यांनी योग्य नियोजन करून भाविकांसाठी चांगली सोय करावी. विशेषतः वाहनतळ व मंदिराकडे जाण्यासाठी मिनीबसच्या व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्याचे योग्य नियोजन संबंधित विभागांनी करावे, अशा सूचना प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिल्या.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, उपकार्यकारी विश्‍वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडीलकर, तहसीलदार रमा जोशी, नायब तहसीलदार सचिन वाघ, घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक जिवन माने, खेडचे सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. लाड, उपअभियंता सुरेश पटाडे, महावितरणचे शैलेश गिते, शरद सहकारी बँकेचे संचालक मारुती लोहकरे आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त, आरोग्य विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग यांचा आढावा घेण्यात आला.
प्रांत अधिकारी कोडोलकर म्हणाले, ‘‘गर्दीची शक्यता लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान व सर्व शासकीय विभागांनी यात्रेचे नियोजन करावे. संपूर्ण श्रावण महिना गर्दी राहणार असल्याने वाहनतळाची मोठी गरज पडणार आहे. यासाठी जुन्या वाहनतळांबरोबर नविन ठिकाणे तयार करून तेथे व्यवस्था करून ठेवा. भीमाशंकर यात्रा नियोजन पाहणी दौऱ्यात या जागांची पाहणी करून जागा मालकांशी चर्चा करू. तसेच, वाहनतळ ते मंदिर जाण्यासाठी रस्ता छोटा असल्याने मोठी वाहने जाऊ शकणार नाहीत. मंदिराजवळ वाहनतळाची व्यवस्था नाही. त्यासाठी एसटी महामंडळाने मिनीबसची व्यवस्था करावी. एसटी महामंडळाबरोबरच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या मिनीबसदेखील सांगाव्यात.

महिनाभर राहणार गर्दी
यावर्षी २९ जुलै ते २७ ऑगस्टदरम्यान श्रावण महिना आहे. कोरोनाची परिस्थिती कमी झाल्याने भीमाशंकरमध्ये सध्या दररोज मोठी गर्दी असते. त्यात ३१ जुलै व ७, १४, २१ ऑगस्ट, असे चार श्रावणी सोमवार आले आहेत. तसेच, १३, १४, १५ व १६, अशा सलग चार दिवस सुट्या आल्या आहेत, ते पाहता संपूर्ण श्रावण महिन्यात गर्दी राहणार आहे, हे लक्षात घेऊन सर्व विभागांनी यात्रेचे नियोजन करावे, अशी सूचना करण्यात आली.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00969 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..