
अवैध धंदे करणाऱ्या १० जणांवर कारवाई
घोडेगाव, ता. २९ ः घोडेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चार ठिकाणी अवैध धंदे करणाऱ्या १० जणांवर घोडेगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत त्यांच्याकडून ५० हजार २१० रुपयांचे साहित्य जप्त केले.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस हवालदार जालिंदर राहणे, शरद मुंढे, स्वप्नील कानडे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना शिनोली गावच्या अलीकडे लक्ष्मण भरत आरोटे (वय - ३२), अविनाश विष्णू आरोटे (वय - २५, दोघे रा. कोंढवळ, ता. आंबेगाव) हे दारू पिऊन धिंगाणा घालत असताना भेटले. त्यांच्याकडे बिगर परवाना बेकायदा दारू व एक मोटार सायकल असे एकंदरीत ४१ हजार ५१० रुपयांचे साहित्य मिळाले.
दुसऱ्या घटनेत शिनोली येथील इंदिरानगर येथे सरकारी दवाखान्याच्या बाजूला पडीक घरामध्ये आन्थॉनी जॉन फर्नांडिस (वय - ४६), मच्छिंद्र थोरात, अविनाश दत्तात्रेय शिंदे (वय - ३०), सचिन सुनील भोकरे (वय - ३३), संतोष बबन बोऱ्हाडे व अमित अनिल बोऱ्हाडे (सर्व रा. शिनोली, ता. आंबेगाव) यांच्या सांगण्यावरून लोकांकडून पैसे घेऊन त्यांना चिठ्ठ्या देऊन मटका नावाचा जुगार खेळताना त्यांच्याकडून १ हजार ४३० रुपयाचे साहित्य मिळाले.
तिसऱ्या घटनेत गणेश ऊर्फ तुषार लक्ष्मण बोऱ्हाडे (वय - ३१ रा. शिनोली, ता. आंबेगाव) व संतोष भीमाजी धादवड (वय - ४२, रा. कानसे, ता. आंबेगाव) त्यांच्याकडील विनापरवाना देशी - विदेशी दारूचा साठा व ३ हजार ३९५ अशी रोख रक्कम मिळाली.
तर चौथ्या घटनेत चास येथील इंदिरानगर येथे साहेबराव ऊर्फ तुषार लक्ष्मण बो-होडे (वय -३१) हा मटका नावाचा जुगार खेळवत असताना भेटला. त्याच्याकडून ३ हजार ८७५ रुपयांचे साहित्य मिळाले. त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचे काम शैलेश काळे (रा. घोडेगाव) याचे सांगण्यावरून १० टक्के कमिशनवरती करीत असल्याचे समजले. या सर्वांची तक्रार घोडेगाव पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी शरद मुंढे यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अविनाश कालेकर, तेजस इष्टे, विठ्ठल वाघ करत आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00999 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..