आदिवासी मुलांच्या क्रांतिकारकांची वेशभूषा लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी मुलांच्या क्रांतिकारकांची वेशभूषा लक्षवेधी
आदिवासी मुलांच्या क्रांतिकारकांची वेशभूषा लक्षवेधी

आदिवासी मुलांच्या क्रांतिकारकांची वेशभूषा लक्षवेधी

sakal_logo
By

घोडेगाव, ता. ११ : येथे (ता. आंबेगाव) येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिवासी बांधवाच्या मुलांनी केलेली क्रांतिकारकांची वेशभूषा लक्षवेधी ठरली. रॅलीमध्ये शेतकरी महिलांनी आदिवासी संस्कृती दर्शन घडविले. तसेच ढोल लेझीम पथक हे आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले.

आदिवासी बाधंवाचे रॅलीद्वारे वनमाला मंगल कार्यालय येथे आगमन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे विक्रीकर उपायुक्त सुधीर घोटकर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर विलास साबळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी बळवंत गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी सुभाष मोरमारे, संजय गवारी, संजय शेळके, मारुती लोहकरे, इंदूबाई लोहकरे, जनाबाई उगले, रूपाली जगदाळे, गौतम खरात, विजय आढारी, संभाजी पारधी, किसन खामकर, अनिता आढारी, डॉ. संजय भवारी, डॉ. हरीश खामकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन काळूराम भवारी तसेच आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती यांनी केले कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्याते म्हणून प्रा. डॉक्टर नितीन तळपाडे यांनी आदिवासी संस्कृती विषयी माहिती दिली. व्याख्याते डॉ. कृष्णा भवारी यांनी आदिवासींची आव्हाने या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाची नियोजन आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती व विविध आदिवासी संघटना यांनी पार पाडले. उमा मते यांनी प्रास्ताविक तर मच्छिंद्र झांजरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हरिश खामकर यांनी आभार मानले.
01672

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b01013 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..