घोडेगाव परिसरात विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडेगाव परिसरात विविध कार्यक्रम
घोडेगाव परिसरात विविध कार्यक्रम

घोडेगाव परिसरात विविध कार्यक्रम

sakal_logo
By

घोडेगाव, ता. १६ ः घोडेगाव, नारोडी (ता.आंबेगाव) परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

घोडेगाव येथील तहसिल कार्यालयात तहसीलदार रमा जोशी, नारोडी येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कैलास काळे, जिल्हा परिषद शाळेत निर्मला हुले, श्री मुक्तादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात श्री मुक्तादेवी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष संतोष पिंगळे, आरोग्य केंद्रात उपसरपंच स्वप्निल पिंगळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

जनता विद्या मंदिर येथे अध्यक्ष अजित काळे, ग्रामपंचायत घोडेगाव येथे सरपंच क्रांती गाढवे, पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, बी. डी. काळे महाविद्यालय येथे अॅड. मुकुंद काळे, जिल्हा परिषद शाळेत अध्यक्ष सचिन जगदाळे यांच्या झेंडावंदन झाले.

घोडेगाव शिवसेना शहरच्या वतीने विजय घोडेकर व गोविंद काळे यांच्या मार्फत संस्थेच्या तीन हजार विद्यार्थ्यांना शालेय वापरातील वस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्ष उपतालुकाप्रमुख अमोल काळे , खंडू खंडागळे, अक्षय नंदकर, लखन घोडेकर, युवराज काळे आदी उपस्थित होते.
गिरवली येथे सरपंच पुजा सैद, चिंचोली येथे सरपंच विद्या कोकणे यांच्या हस्ते ध्वजावंदनाचा कार्यक्रम पार पडला.
-------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b01017 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..