भीमाशंकर येथे पोलिसांना धक्काबुक्की प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमाशंकर येथे पोलिसांना धक्काबुक्की प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
भीमाशंकर येथे पोलिसांना धक्काबुक्की प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

भीमाशंकर येथे पोलिसांना धक्काबुक्की प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २१ : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घालून धक्काबुक्की केल्या प्रकरणी सुधीर झोडगे, तुषार नवले यांच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
भीमाशंकर येथे पोलिसांच्या वतीने पाच वाहनतळ सुरू करण्यात आले आहेत. या वाहनतळासाठी पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड, आरसीपी पथक यांची नियुक्ती केली आहे. भीमाशंकर वाहनतळ क्रमांक दोन येथे पोलिस नाईक तेजस इष्टे व इतर कर्मचारी बंदोबस्तावर असताना बाभूळगाव खालसा(ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथील गाडी क्रमांक एम. एच १६ बीझेड ००१४ या गाडीतून सुधीर सुनील झोडगे (वय ३०) व तुषार भगवान नवले (वय२९) यांनी सरकारी कामात अडथळा करत व पोलिस कर्मचारी यांच्याशी अरेरावीचे व उद्धटपणाचे वर्तन करत पोलिस कर्मचाऱ्यांचा डावा हात पिरगळून शिवीगाळ केली. तसेच बाजूला ढकलून धक्का बुक्की करून तुझ्याकडे बघतोच, अशी धमकी दिली. चारचाकी वाहनाने बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेल्या बॅरीकेटला धडक देवून दुसऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत केली असल्याची तक्रार पोलिस नाईक तेजस इष्टे यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश डौले, पोलिस हवालदार दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर, गणेश गवारी करत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b01025 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..