‘आयकर भरणाऱ्यांना रेशन अनुदानापासून दूर करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयकर भरणाऱ्यांना रेशन अनुदानापासून दूर करा’
‘आयकर भरणाऱ्यांना रेशन अनुदानापासून दूर करा’

‘आयकर भरणाऱ्यांना रेशन अनुदानापासून दूर करा’

sakal_logo
By

घोडेगाव, ता. ३ : सवलतीच्या दराने अन्नधान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानातून बाहेर पडा ही राज्य सरकारची योजना कार्यान्वित न करता, यातील वार्षिक उत्पन्न मर्यादा काढून, केवळ आयकर भरणाऱ्यांना वगळून इतर सर्व कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ द्यावा, अशी मागणी किसान सभा आंबेगाव तालुका समितीने केली आहे. त्या संदर्भातले निवेदन आंबेगाव तहसीलदारांकडे देण्यात आले आहे.
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या लाभार्थ्यांनी धान्याचा लाभ न घेता स्वतःहून लाभ सोडावा व या योजनेतून बाहेर पडावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा आदेश काढला आहे. प्रशासनाने अशा प्रकारची अंमलबजावणी करण्याचा निर्णय हा सन २०१६ मध्ये भाजप युती सरकारने काढलेल्या शासकीय आदेशानुसार घेतला आहे. त्या आदेशाला यापूर्वीच विरोध झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नव्हती. परंतु, आता पुणे विभागातील पाच जिल्ह्यांसाठी त्याचे पुनरुज्जीवन प्रशासनाने केले आहे. या आदेशामुळे सामान्य, गोरगरीब कष्टकरी समाजात गैरसमज पसरले आहेत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत स्वस्त धान्य मिळण्यास पात्र ठरण्यासाठी शासनाने जी ग्रामीण भागासाठी ४४ हजार रुपये व शहरी भागासाठी ५९ हजार रुपये ही वार्षिक उत्पन्नाची अट घातली आहे, तीच मुळात चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक आहे. बहुतांश कष्टकरी व गरीब कुटुंब अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मिळत असलेल्या धान्यापासून वंचित आहेत. ‘बलशाली भारत’ बनवण्यासाठी स्वस्त रेशनचा त्याग करावा. अशी जी भूमिका मांडली आहे, तिचा आधार काय आहे? हे प्रशासनाने जाहीर करावे. तक्रार देण्यासाठीचा टोल फ्री नंबर हा अधिकाधिक लोकांना कसा माहीत होईल याबाबत प्रयत्न व्हावेत. अशी मागणी नायब तहसीलदार अनंता गवारी यांच्याकडे किसान सभा समितीच्या नंदा मोरमारे, सुभाष भोकटे, दत्ता गिरंगे, रामदास लोहकरे, बाळू काठे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b01040 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..