कार्यकारी संस्थांनी व्यवसाय सुरू करावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यकारी संस्थांनी व्यवसाय सुरू करावेत
कार्यकारी संस्थांनी व्यवसाय सुरू करावेत

कार्यकारी संस्थांनी व्यवसाय सुरू करावेत

sakal_logo
By

घोडेगाव, ता. ७ : "विविध कार्यकारी संस्थांनी यापुढे पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज वाटप करून इतरही व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. यापुढील काळात स्वताःचा व्यवसाय उभारणाऱ्या संस्था प्रगती करतील,'''' असे मत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील घोडेगाव क्र. १ विविध कार्यकारी संस्थेला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोसायटीतील ज्येष्ठ सभासदांचा सत्कार वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
वळसे पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या पूर्वी १९२१ साला मध्ये ही सोसायटी स्थापन झाली आहे. ब्रिटिश राजवट असताना आपल्या जुन्या मंडळींनी विचार करून सोसायट्या, ग्रामपंचायती स्थापन केल्या व शंभर वर्ष संभाळल्या. शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी समाजात एकोपा ठेवून या संस्था उभ्या केल्या आहे. आजही वर्षा अखेरीस मिळणा-या लाभांशचा आनंद शेतकऱ्यांना मोठा असतो. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पुढील काळात सहकारावर मोठा परिणाम होणार आहे. यात छोट्या बॅंका, सहकारी संस्था टिकवणे हे मोठे आवाहन राहणार आहे. त्यामुळे आपल्या वडिलधाऱ्या जुन्या लोकांनी १०० वर्षांपासून जोपासलेल्या व शेतकऱ्यांना अडीनडीला उपयोगात आलेल्या संस्था अडचणीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश काळे, उपाध्यक्ष एकनाथ घोडेकर, शारदा प्रबोधिनीचे पांडुरंग महाराज येवले, माजी सभापती कैलासबुवा काळे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, माजी सभापती सखाराम घोडेकर, सखाराम पाटील काळे, वसंत काळे, किरण घोडेकर, क्रांती गाढवे, रूपाली झोडगे, मंजूषा बोऱ्हाडे, सुदाम काळे, सोमनाथ काळे, तुकाराम काळे, विनोद कासार, सचिव नीलेश झोडगे आदि उपस्थित होते.
यावेळी कैलासबुवा काळे, पांडुरंग महाराज येवले, क्रांती गाढवे, वसंत काळे, किरण घोडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. विजय काळे, ज्ञानेश्वर काळे यांनी सूत्रसंचालन केले.


01723

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b01043 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..