नॉलेज कॉलेज व्हिलेज उपक्रमाअंतर्गत करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॉलेज कॉलेज व्हिलेज 
उपक्रमाअंतर्गत करार
नॉलेज कॉलेज व्हिलेज उपक्रमाअंतर्गत करार

नॉलेज कॉलेज व्हिलेज उपक्रमाअंतर्गत करार

sakal_logo
By

घोडेगाव, ता. १९ ः नॉलेज-कॉलेज-व्हिलेज या उपक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांमध्ये सामंजस्य करार झाला. यामध्ये संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व एनएसएस कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले. बी. डी. काळे महाविद्यालय, घोडेगाव, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, खेड, ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, एम. आय. टी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, आळंदी, सी. टी. बोरा कॉलेज, शिरूर व मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, गणेशखिंड या महाविद्यालयांचा यात समावेश आहे.
या उपक्रमाची कल्पना नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. कैलास बवले यांची असून हा सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड. मुकुंद काळे, प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर, माजी प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांनी प्रयत्न केले. या महाविद्यालयांमधून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या कराराच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातील. कराराची प्रत बी. डी. काळे महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. पोपटराव माने यांनी स्वीकारली.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b01057 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..