कोंढवळ येथील मुलीचा संशयास्पद मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंढवळ येथील मुलीचा संशयास्पद मृत्यू
कोंढवळ येथील मुलीचा संशयास्पद मृत्यू

कोंढवळ येथील मुलीचा संशयास्पद मृत्यू

sakal_logo
By

घोडेगाव /शिनोली, ता. २५ : कोंढवळ (ता. आंबेगाव) येथील युवकाने अल्पवयीन मुलीबरोबर शारिरिक संबंध ठेवले. तिने ‘लग्न कर’ अशी वारंवार मागणी केल्यानंतर तिला पळवून नेले आणि जबरदस्तीने विष पाजून मारले, अशी तक्रार मुलीच्या आईने केली. त्यावरून आरोपीस अटक केली. मात्र, त्याने मुलीने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत घोडेगाव पोलिसांनी माहिती दिली की. रोहिदास जीवन कारोटे (वय २१, रा. कोंढवळ, पो. तळेघर, ता. आंबेगाव) व अल्पवयीन मुलीचे सुमारे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिला त्याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तिने त्यास लग्न करू, अशी वारंवार मागणी केली. मात्र, त्याने लग्न मान्य नसल्याने व त्यास ती आवडत नसल्याने त्याने तिला आपले लग्न होत नाही. आपण आत्महत्या करू, असे सांगितले. त्यानंतर घोडेगाव येथील एका दुकानातून उंदीर मारण्याचे औषध आणले. १३ नोव्हेंबर रोजी तळेघर येथील हॉटेलमधून पेढा घेतला. त्यात उंदीर मारण्याचे औषध मिसळले व मुलीला घराबाहेर शेतात बोलविले. तो पेढा तिला खाऊ घातला. त्या औषधाचा तिच्यावर परिणाम होत नाही व ती मरत नाही, असं पाहून त्याने तिला पुण्याला पळवून नेले व नातेवाइकांकडे राहिले. तेथे असताना तिला उलट्या झाल्या. त्यावेळी त्याने तेथील स्थानिक दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या व औषधे त्याने तिला दिले नाही. १९ नोव्हेंबर रोजी तिने पाणी मागितले असता त्याने तिला उंदराचे औषध घातलेला पेढा देऊन ठार केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, रोहिदास कारोटे याने मुलीने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांना सांगितले.