मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर घोडेगाव पोलिसांची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर
घोडेगाव पोलिसांची कारवाई
मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर घोडेगाव पोलिसांची कारवाई

मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर घोडेगाव पोलिसांची कारवाई

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील शाळा, महाविद्यालय व बसस्थानक परिसरात कॉलेजमधील युवक व बाहेरील युवकांचा विनाकारण वावर असतो. अशा मोटारसायकलवरून फिरणाऱ्या ३८ युवकांना पोलिस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली.
या युवकांना प्रतिबंधक करण्यासाठी घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी कडक कारवाई सुरू केली असून, मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई सुरू केली आहे. मागील 2 दिवसांत 38 युवकांना पोलिस ठाण्यात बोलून समज दिली आहे. यावेळी त्यांच्या पालकांना बोलावून घेतले होते. शाळा, महाविद्यालय सुरू असताना बाहेर फिरणारे, बस स्थानक परिसरात थांबून राहणारे, चौकात थांबून राहणारे, विनाकारण मोटारसायकल फिरवणारे, ट्रिपल सीट फिरणारे, कर्कश हॉर्न वाजवणे, आरडाओरडा करणे, असे करणाऱ्या युवकांच्या हालचालींवर साध्या वेशातील पोलिस नजर ठेवून असून, खात्री झाल्यावर कारवाई केली जात आहे.