डिंभेतील २०० ग्राहकांची वीजबिले दुरुस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिंभेतील २०० ग्राहकांची वीजबिले दुरुस्त
डिंभेतील २०० ग्राहकांची वीजबिले दुरुस्त

डिंभेतील २०० ग्राहकांची वीजबिले दुरुस्त

sakal_logo
By

घोडेगाव, ता ११ : डिंभे (ता. आंबेगाव) येथील घोडेगाव विद्युत उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शाखा कार्यालयात २०० हून अधिक ग्राहकांची वीजबिले दुरुस्त करण्यात आली. आंदोलनाच्या दिवशी दिलेल्या आश्वासनानुसार कार्यालयाने त्वरित दखल घेतल्याने ग्राहकांमध्ये समाधान आहे. यापुढे वेळेत बिल देण्याची मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील विद्युत ग्राहक वीजबिलाच्या समस्येमुळे वैतागले होते. किसान सभेने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच बहुतेक ग्राहकांची विजबिले कमी झाली. पुन्हा विजबिले वाढीव आल्यास किसान सभा आक्रमक होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात रीडिंग न घेता चुकीच्या पद्धतीने नागरिकांना विजबिले दिली जात होती. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसानसभेने तळेघर येथे “रास्ता रोको” चा इशारा दिला होता. त्याची दखल घेत सहायक अभियंता शैलेश गिते यांनी किसानसभेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. त्यात संघटनेच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. आदिवासी भागातील विज ग्राहकांना वाढीव बिल आले तर घोडेगाव येथे जाऊन बिल दुरुस्त करावे लागत होते. परंतु यापुढे वीजबिल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तळेघर, अडिवरे, डिंभे या गावांत बाजाराच्या दिवशी दुरुस्त केले जाईल, असे आश्वासन महावितरणे दिले होते. त्यानुसार तळेघर येथे बाजाराच्या दिवशी उपस्थित राहून अधिका-यांनी दोनशेपेक्षा अधिक जणांची विजबिले कमी करून दिली.
तळेघरप्रमाणेच अडिवरे व डिंभे येथे दुरुस्ती अभियान न राबविल्यास तसेच पुन्हा वाढीव बिले आल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा किसान सभेने दिला आहे. यावेळी किसान सभेचे जिल्हा सहसचिव अशोक पेकारी, आंबेगाव तालुकाध्यक्ष नंदाताई मोरमारे, सचिव रामदास लोहकरे, सुभाष भोकटे, अशोक जोशी, लक्ष्मण मावळे, देविका भोकटे, दत्ता गिरंगे, अशोक पारधी आदी उपस्थित होते.