आंबेगाव तालुक्यात उपसरपंच निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव तालुक्यात उपसरपंच 
निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
आंबेगाव तालुक्यात उपसरपंच निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

आंबेगाव तालुक्यात उपसरपंच निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २९ : आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तर, उपसरपंचपदाच्या निवडणुका ३, ४, ५ व ६ जानेवारी २०२३ रोजी होणार आहेत. सरपंच पदाच्या निवडणूका थेट झाल्या असल्या तरी उपसरपंच पदाची निवडणूक निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.

तालुक्यातील आहुपे, तळेघर, डिंभे खुर्द, घोडेगाव, साल, आंबेदरा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांच्या निवडणुका ३ जानेवारी रोजी होणार असून, ४ जानेवारी रोजी आमोंडी, गंगापूर खुर्द, चिंचोडी, चांडोली बुद्रुक, कळंब, पारगाव तर्फे खेड या ग्रामपंचायतींची उपसरपंच निवडणूक होणार आहेत. ५ जानेवारी रोजी मेंगडेवाडी, धामणी, भावडी, नारोडी, गोहे खुर्द, निघोटवाडी या ग्रामपंचायतींची उपसरपंच निवड होणार आहे. ६ जानेवारी रोजी रांजणी, चिखली, नागापूर येथील उपसरपंच निवडी होणार आहेत. घोडेगाव व नारोडी येथे उपसरपंचपदासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे.

उपसरपंचांची निवडणूक घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींसाठी निवडणूक निरीक्षकांच्या नेमणुका केलेल्या आहेत. उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करून घेणे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे तसेच उमेदवारी अर्ज मागे घेणे याबाबत संपूर्ण प्रक्रियेतील निवडणूक नियंत्रण करणे कामी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.