चिंचोली येथे धावले १९२ बैलगाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचोली येथे धावले १९२ बैलगाडे
चिंचोली येथे धावले १९२ बैलगाडे

चिंचोली येथे धावले १९२ बैलगाडे

sakal_logo
By

घोडेगाव, ता. १ : चिंचोली (ता. आंबेगाव) येथील कपालेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत १९२ बैलगाडे धावले. घाटाचा राजा म्हणून दत्तात्रेय मारूती गायकवाड तर फायनल सम्राट म्हणून स्वर्गीय सखाराम किसन लोहोट यांनी बक्षीस जिंकले.
सकाळी ९ वाजता नवीन घाटाचे उद्‌घाटन शिरूर लोकसभा युवक अध्यक्ष सचिन भोर, भाजपाचे तालुका अध्यक्ष ताराचंद कराळे, भानुदास काळे, सरपंच विद्याताई कोकणे यांच्या हस्ते झाले.
सकाळी श्रींचा अभिषेक, पालखीची मिरवणूक व रात्री बहुरंगी महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. मंदिराचा कलशारोहन समारंभ पांडुरंग महाराज येवले यांच्या हस्ते पार पडला. बैलगाडा शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण सरपंच विद्या संजय कोकणे यांच्या सहकार्याने करण्यात आले. घाटाला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, देवदत्त निकम, अरूण गिरे, कैलासबुवा काळे, देविदास दरेकर, जयसिंग एरंडे यांनी भेट दिली. नवीन घाटाला सहकार्य करणारे रामदास घोलप, विष्णु कोकणे, स्वप्नील कोकणे, दशरथ कोकणे, बबन कोकणे, नामदेव रोकडे, ज्ञानदेव कोकणे यांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक - खंडूशेठ रामकृष्ण सैद
व्दितीय क्रमांक - बाबाजी विलास सैद
तृतीय क्रमांक - सखाराम गेनभाऊ घोडेकर
चतुर्थ क्रमांक - दादाभाऊ शिंदे
..............................................................................................................................................................................................
02005