Sat, June 3, 2023

नारोडी येथील नेत्र चिकित्सा शिबिराला प्रतिसाद
नारोडी येथील नेत्र चिकित्सा शिबिराला प्रतिसाद
Published on : 22 February 2023, 9:07 am
घोडेगाव ता २२ : नारोडी (ता आंबेगाव) येथे उपसरपंच प्रसाद काळे व शिवसेना शाखा नारोडी तसेच डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र चिकित्सा मोफत चष्मा वाटप व मोतीबिंदू शिबिर पार पडले. शिवजयंतीनिमित्त नारोडी ग्रामपंचायत समोर शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात एकूण २४४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १३५ नागरिकांची मोफत नेत्र चिकित्सा करून चष्मे वाटप करण्यात आले. तर, २२ नागरिकांना मोतीबिंदू आढळला. १४ जणांना ऑपरेशनसाठी डॉ मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव येथे पाठविले. या वेळी उपसरपंच प्रसाद काळे, संतोष हुले, अजित हुले, अनुराधा जांबुकर, ज्योती हुले, भूमिका हुले, दत्ता हुले, सचिन पिंगळे, रामदास हुले, सुदर्शन जांबुकर, ऋषिकेश शेवाळे, अक्षय हुले आदी उपस्थित होते.