नारोडी येथे साकव पुलाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारोडी येथे साकव पुलाचे भूमिपूजन
नारोडी येथे साकव पुलाचे भूमिपूजन

नारोडी येथे साकव पुलाचे भूमिपूजन

sakal_logo
By

घोडेगाव, ता. ८ : नारोडी (ता. आंबेगाव) येथील रोहिमाळ वस्तीवरील रस्त्यावर ६० लाख रुपये खर्चून साकव पूल होणार आहे. त्याचे भूमिपूजन शरद सहकारी बँकेचे
उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते झाले.
भूमिपूजनप्रसंगी वळसे पाटील म्हणाले की, नारोडीच्या विकास कामात नेहमीच नामदार दिलीप वळसे पाटील यांचा वरदहस्त आहे. अतिवृष्टीत वाहून गेलेला हा पूल तातडीने दुरुस्त केला. गावातील कब्रस्तान संरक्षण भिंतीसाठी १० लाख रुपये, तेलशेत येथील रस्ता डांबरीकरणासाठी १० लाख रुपये बिरकेवस्तीवरील सभामंडपासाठी पाच लाख रुपये चा निधी मंजूर करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती कैलासबुवा काळे होते.
यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माऊली घोडेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक नवनाथ डुले, सरपंच मंगलताई हुले, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, सुदाम काळे, तानाजी जंबुकर, सोमनाथ काळे, दत्तात्रेय कोकणे, संतोष पिंगळे, नारायण पाटील हुले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, सोपान घोडेकर, ज्योती हुले उपस्थित होते.
यावेळी कैलासबुवा काळे, नारायण पाटील हुले यांची भाषणे झाली. सोपान घोडेकर यांनी सूत्रसंचालन तर नवनाथ हुले यांनी आभार मानले.

02074