पुरातन शस्त्र, नाण्यांचे नारोडी येथे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरातन शस्त्र, नाण्यांचे नारोडी येथे प्रदर्शन
पुरातन शस्त्र, नाण्यांचे नारोडी येथे प्रदर्शन

पुरातन शस्त्र, नाण्यांचे नारोडी येथे प्रदर्शन

sakal_logo
By

घोडेगाव, ता. ११ : नारोडी (ता. आंबेगाव) येथील हुले स्थळ नं. २ येथे शिवजयंतीनिमित्त विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी पुरातन शस्त्र व नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याचा लाभ ४०० विद्यार्थी व ३०० ग्रामस्थांनी घेतला. गावात भव्य पुरातन शस्त्र व नाणी प्रदर्शन अनिल धोत्रे व अविनाश धोत्रे यांचे भरविले होते. त्यास ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
शिवनेरीवरून शिवज्योत प्रज्वलित करून आणून नारोडी येथे मिरवणूक काढण्यात आली. शस्त्र प्रदर्शनामध्ये चामड्याची ढाल, सरळ पात्याची धोप, पोलादी ढाल वाघनखे, मराठा कट्यार, मराठा वक्र धोप, पट्टा, दस्तान, अंकुश, गोफणं, सिरोही कट्यार, विविध प्रकारच्या कुऱ्हाडी, तोफगोळे, गुप्ती, रजपूत तलवार तर नाणी यामध्ये बिंदुमय शिवराई, दुंदाडी शिवराई, शिवमुद्रा इत्यादी शिवकालीन वस्तूंचा संग्रह ठेवण्यात आला होता. हे प्रदर्शन पाहून परिषद शाळा व श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग भारावून गेले.
शिक्षक भगवान भोर, नंदा शिंगाडे, दत्तात्रेय भोर, प्रमोद चपटे, मुख्याध्यापक गाडे ए. व्ही. यांनी मुलांना प्रदर्शन पाहण्याची संधी दिली. सायंकाळी बालशिव व्याख्यात्यांची व्याख्यान झाली. यावेळी सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला बक्षीसे शिवाजी बाबूराव काजळे यांच्या वतीने देण्यात आले. महिलांसाठी सायंकाळी हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला. यावेळी त्यांना भेटवस्तू सुवर्णा देविदास दरेकर यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान झाले. यावेळी देविदास दरेकर, शरद पोखरकर, सरपंच मंगलताई हुले, बाबाजी हुले व देविदास हुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश हुले, संतोष हुले यांनी तर आभार प्रदर्शन उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ हुले यांनी केले.
...........................................................................................................................................................................................

02084