नारोडीच्या विकासासाठी कटिबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारोडीच्या विकासासाठी कटिबद्ध
नारोडीच्या विकासासाठी कटिबद्ध

नारोडीच्या विकासासाठी कटिबद्ध

sakal_logo
By

घोडेगाव, ता. १८ ः ‘नारोडीच्या विकास कामाला निधीची कमतरता पडू देणार नाही,’ असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेतील माजी गटनेते शरद बुटे पाटील यांनी सांगितले.

नारोडी (ता. आंबेगाव) येथील गणेश नगरजवळील ओढ्यावर ६० लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या साकव पुलाचे भूमीपूजन शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी ग्रामस्थांनी नारोडीतील अनेक विकास कामांची मागणी पाटील यांच्याकडे केली. त्यावेळी बुटे पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून नारोडीमध्ये सद्यःस्थितीत एक कोटी सत्तर लाखाची कामे मंजूर झाली आहेत, परंतु हे सर्व करत असताना गावाने देखील विकास काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहावे, असे आवाहन बुट्टे पाटील यांनी केले.

यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, भाजप जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, तालुका अध्यक्ष ताराचंद कराळे, संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले. सरपंच मंगल हुले, तालुका उपाध्यक्ष सुदर्शन जंबुकर, प्रतिभा पवार, ज्योती काळे, मंगल केरभाऊ हुले, सोपान हुले, संतोष पिंगळे, सावता वाघमारे, सुजित पिंगळे, अमोल विधाटे, गोरक्ष पिंगळे उपस्थित होते.

याप्रसंगी जयसिंग एरंडे, ताराचंद कराळे, नवनाथ घुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले.
............................................................................................................................................