आंबेगाव विकास मंडळाच्या अध्यक्षपदी तुकाराम काळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव विकास मंडळाच्या अध्यक्षपदी तुकाराम काळे
आंबेगाव विकास मंडळाच्या अध्यक्षपदी तुकाराम काळे

आंबेगाव विकास मंडळाच्या अध्यक्षपदी तुकाराम काळे

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २७ : येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ या संस्थेच्या अध्यक्षपदी तुकाराम काळे, तर सचिवपदी अक्षय काळे यांची बिनविरोध निवड झाली.
संचालक मंडळाच्या सभेमध्ये नवीन कार्यकारिणी निवडली. यावेळी निवड झालेली नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे- कार्याध्यक्ष व समन्वय समिती प्रमुख-शाम होनराव, इंग्लिश मीडियम व वस्तीग्रह अध्यक्ष- बाळासाहेब काळे, बी.डी.काळे महाविद्यालय विकास समिती व नर्सिंग डिप्लोमा अध्यक्ष- ॲड.मुकुंद काळे, सल्लागार मंडळ- शिवाजी घोडेकर, शिवदास काळे, ॲड.मुरलीधर काळे, ॲड.महेश काळे, नरेंद्र काळे, सुकाणू समिती-निळकंठ होनराव, जयसिंग काळे, अजित काळे, डॉ.विलास काळे, विलास शिंदे.