Sun, May 28, 2023

एसटीच्या अनियमिततेमुळे नारोडी परिसरात प्रवास त्रस्त
एसटीच्या अनियमिततेमुळे नारोडी परिसरात प्रवास त्रस्त
Published on : 26 March 2023, 12:54 pm
घोडेगाव, ता. २६ : मंचर ते नारोडी या एसटी बसच्या अनियमित सेवेमुळे प्रवासी त्रासले आहेत. अनेक बस फेऱ्या रद्द केल्या जातात. तसेच मुक्कामी एस.टी बस बंद केली आहे. याचा जाब विचारण्यासाठी नारोडी गावातील ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार यांनी राजगुरुनगर येथील व्यवस्थापकाची भेट घेऊन लेखी तक्रार केली व महाळुंगे पडवळ, चास व नारोडी मार्गे मुंबई एसटी सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोपान हूले, कार्याध्यक्ष एकनाथ हुले, कांदा बटाट्याचे व्यापारी बबन पिंगळे, महाराष्ट्र बँकेचे सुनील पिंगळे, विठ्ठलराव मोरे, रामदास वाघमारे उपस्थित होते. दरम्यान, व्यवस्थापक यांनी याबाबत लवकरच मार्ग काढला जाईल, असे सांगितले.