आहुपे खोऱ्यातील गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

आहुपे खोऱ्यातील गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

घोडेगाव, ता. २४ : आहुपे खोऱ्यात गव्यांचा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे शेतीची प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. मागील वर्षी हातातोंडाशी आलेल्या भात पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. वनविभागाने मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गव्यांपासून झालेल्या नुकसानीचा आजपर्यंत पंचनामा ही केला नाही. नुकसान भरपाई सुद्धा दिलेली नाही.याबाबत बिरसा ब्रिगेडने घोडेगावच्या वनपरीक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे यांना निवेदन देण्यात आले.

हे आमच्या एकट्याचे काम नाही असे म्हणून वनखात्याचे अधिकारी हात वर करत असल्याने न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न आदिवासी महिलांनी उपस्थित केला आहे.
नुकसान भरपाई न मिळाल्यास घोडेगाव येथील
वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा वनविभागाला दिलेल्या निवेदनात केला आहे. आय.सी.आय फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी राजपूर, सावरली, पाटण, डोण इत्यादी भागात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. ती गव्यांनी खाऊन टाकली आहे. मात्र अजूनपर्यंत कोणीही वनविभागाचे अधिकारी तिकडे फिरकले नाहीत. यामुळे वनविभागाने जर या गव्यांचा त्वरित बंदोबस्त केला नाहीतर घोडेगाव येथील कार्यालयावर बिरसा ब्रिगेड व तिरपाड ग्रामपंचायतीच्या वतीने मोर्चा काढणार असल्याची माहिती मातृशक्ती प्रमुख उमा मते यांनी दिली.
यावेळी ताराबाई डामसे, मंगलताई कवठे, कविता डगळे, अरुणा खमसे इत्यादी महिला उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com