आंबेगावात खरेदी विक्री संघात मुबलक बियाणे व खते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावात खरेदी विक्री संघात मुबलक बियाणे व खते
आंबेगावात खरेदी विक्री संघात मुबलक बियाणे व खते

आंबेगावात खरेदी विक्री संघात मुबलक बियाणे व खते

sakal_logo
By

घोडेगाव, ता १७ : ''खरीप हंगामाच्या तयारीसाठी रासायनिक खते, बी-बियाणे आणि पशुखाद्य आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तालुक्यातील विविध केंद्रांवर विक्रीस उपलब्ध झालेले आहे. शेतकऱ्यांनी केंद्रांवर जाऊन शासकीय दराने कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात, कृषी निविष्ठा खरेदीसाठी येताना शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन यावे,'' असे आवाहन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित यांच्याकडे दर्जेदार इंद्रायणी भात बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. बियाणे वाटप संस्थेच्या घोडेगाव डेपो व डिंबा डेपो येथून करण्यात येत आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाने पशुखाद्य व्यवसाय नव्याने सुरू केला आहे. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी याचा अवश्य फायदा करून दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन व्यवस्थापक गणेश हुले यांनी केले आहे.
तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर देण्यास शेतकऱ्यांना आवाहन आहे. कोणत्याही परिस्थितीत खरीप हंगामात जास्त दराने खत विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे, असे आवाहन कृषी अधिकारी मनोज कोल्हे यांनी केले आहे.

''ना नफा ना तोटा'' या तत्त्वावर खत खरेदी
शेतकऱ्यांसाठी बटाटा लागवड, ऊस व तरकारी वाणासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची रासायनिक खते संस्थेच्या विक्री केंद्रावर उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी डिंभे, घोडेगाव, मंचर, निरगुडसर, लोणी, धामणी व रांजणी येथील विक्री केंद्रातून योग्य व वाजवी दरामध्ये ''ना नफा ना तोटा'' या तत्त्वावर शेतकऱ्यांनी खत खरेदी करावी.