मोटारीच्या धडकेत
दुचाकीस्वाराचा मृत्यू

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

घोडेगाव, ता. २० : पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथे घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्यावर दुचाकीवरून चाललेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मोटारीची धडक बसल्याने मृत्यू झाला. बबन गंगाराम बोऱ्हाडे (वय ७२, रा. कानसे), असे त्यांचे नाव आहे.
याबाबत घोडेगाव पोलिसांनी माहिती दिली की, बोऱ्हाडे हे त्यांची स्कुटी (क्र. एमएच १४ एफई ३६८०) हे स्कुटीवरून शेतीसाठी तणनाशक औषध आणण्यासाठी घोडेगाव येथे जात असताना पिंपळगाव घोडे गावच्या हद्दीत त्यांना टाटा पंच कार (क्र. एमएच १२ व्हीजी ६०७८) या गाडीने समोरून धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी ते औषधोपचार करण्यापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. याबाबत श्रीकांत बबन बोऱ्हाडे याने घोडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी मोटार चालक सोपान लक्ष्मण गोडसे (रा. चांडोह पोस्ट, पिंपरखेड, ता. शिरूर) यांच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ए. एस. वायाळ करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com