
मंचर येथे दुचाकीस्वाराचा मृत्यू
घोडेगाव, ता. २५ : मंचर (ता. आंबेगाव) येथील पुणे-नाशिक महामार्गावर मॅक्स केअर हॉस्पिटलसमोर भरधाव दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार योगेश
महादू वायाळ (वय २८ रा. अवसरी खुर्द ) याचा मृत्यू झाला. याबाबत वैभव वायाळ यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
हा अपघात हा मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास झाला. अपघातात त्याची दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी योगेश याला मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या डोक्यास, छातीस, पायास गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याला मंचर येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास एस. टी. जांभळे करत आहे.
......................................
02207